शरद पवार साताऱ्यातून निवडणूक का लढत नाहीत? मोदींचा सवाल


एएमसी मिरर : वेब न्यूज
सातारा हा राष्ट्रवादीचा गड मानला जातो. त्यामुळे भाजपच्या उदयनराजेंविरोधात शरद पवारांनी निवडणूक लढवावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली होती. मग शरद पवार साताऱ्यातून निवडणूक का लढत नाहीत? स्वतःच्या किल्ल्यात लढण्याची हिंमत का करत नाहीत? पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील साताऱ्यातून लढण्यास नकार का दिला? असे सवाल उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर निशाना साधला आहे.


सातारा लोकसभेची पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुक एकत्र होत आहे. माजी खासदार उदयनराजे भोसले भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर सातारा लोकसभेची जागा लढवत आहेत. उदयनराजेंच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः साताऱ्यात आले होते. यावेळी मोदींनी साताऱ्यात सभा घेतली. या सभेत मोदींनी उदयनराजेंचं कौतुक केले. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली.
मोदी म्हणाले की, साताऱ्याने देशाला यशवंतराव चव्हाण यांच्यासारखा थोर नेता दिला. सातारा ही माझी गुरुभूमी आहे. माझे गुरु लक्ष्मणराव इनामदार हे याच पुण्यभूमीतले आहेत. त्यामुळे सातारा माझ्यासाठी तीर्थ आहे.

Post a Comment

Previous Post Next Post