पसार आरोपीच्या नावे पवारांचा कारखाना उभा राहतोच कसा? खासदार विखेंचा सवाल


एएमसी मिरर : नगर
राहुरी मतदार संघात केलेल्या विकास कामांमुळे व जनसंपर्क यामुळे आ.शिवाजी कर्डिले यांचा विजय निश्चित आहे. राज्यात राधाकृष्ण विखे एक नंबर व कर्डिले दोन नंबरच्या मताधिक्क्याने विजयी होतील, असा दावा खा. सुजय विखे पाटील यांनी केला आहे. विखे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसवरही तोफ डागली.
माझा प्रॉब्लेम एखाद्या उमेदवाराबाबत नाही, तर राष्ट्रवादीबाबतचा आहे. म्हणून आपण राष्ट्रवादीच्या उमेदवाराची अनामत जप्त केल्याशिवाय राहणार नाही. शरद पवार यांच्यावर मला टीका करायची नाही. कारण, त्यांच्यामुळेच आपण खासदार व वडील मंत्री झालेत. सत्ता असताना सत्तेची मुजोरी दाखविली. आता रडून मते मागण्याचा यांना अधिकार आहे का? गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात पसार आरोपीच्या नावे पवारांचा जगदंबा कारखाना उभा राहतोच कसा? असा सवाल डॉ. विखे यांनी उपस्थित केला आहे.
राहुरी येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. खा. विखे पाटील म्हणाले की, डॉ. तनपुरे साखर कारखाना सुरू करून सभासदांचा अधिकार जिवंत ठेवला. याकामी आ.कर्डिले यांचे मोलाचे योगदान आपण कधीच विसरू शकणार नाही. राष्ट्रवादीला भाड्याने माणसं आणावी लागत आहेत, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post