शिवसेना प्रत्येकाच्या मनात भिनलेली आहे : सुचिता परदेशी


एएमसी मिरर : नगर
आज अनिल राठोड यांच्यासारखे अनेक शिवसैनिक, पदाधिकारी सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झगडत आहेत. अनेकांना कधी पदेही मिळाली नाहीत. मात्र, त्यांनी भगव्याची साथ सोडली नाही. सर्वसामान्यांच्या विश्वासाला राठोड यांनी तडा जाऊ दिला नाही. जनतेचा विश्वास आजही शिवसेनेवरच आहे. शिवसेना प्रत्येकाच्या मनामनात भिनलेली आहे, असे प्रतिपादन सुचिता परदेशी यांनी केले.
शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ राठोड समाजातील महिलांनी बाजारपेठेतून प्रचार फेरी काढत नागरिकांशी संवाद साधला. आपला उमेदवार धनुष्यबाण आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार घेऊन, सर्वांनासोबत घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे, असे त्या म्हणाल्या. नेतासुभाष चौक, तेलीखुंट, कापडबाजार, भिंगारवाला चौक, नवीपेठ परिसरातील दुकानदार, ग्राहक, नागरीकांशी त्यांनी संवाद साधला.

Post a Comment

Previous Post Next Post