नगर जिल्ह्यात शिवसेना-भाजपचाच प्रचार करणार; 'आरपीआय'चे स्पष्टीकरण


एएमसी मिरर : नगर
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महायुतीतील भाजप व शिवसेना पक्षाच्या नगर जिल्ह्यातील उमेदवारांचा प्रचार करून आयपीआय युतीचा धर्म पाळणार आहे, अशी माहिती आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनिल साळवे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेना-भाजपने रामदास आठवले यांना केंद्रात मंत्रीपद दिले आहे. त्यामुळे आरपीआय पक्ष युतीचा धर्म पाळणार असून नगर जिल्ह्यातील शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवाराचाच प्रचार आम्ही करणार आहेत. पक्षातील काही नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर केली जाईल. निवडणुकीत कार्यकर्ते आपली भूमिका मांडत असतात. परंतु निवडणूक कोणी लढवायची तो निर्णय पक्षाचे अध्यक्ष आठवले हे घेतात. त्यामुळे आम्ही नगर जिल्ह्यात युतीचा धर्म पाळणार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी विनोद भांबळ, भाऊसाहेब साळवे, जितू ठोंबे, शिवाजी साळवे, सचिन साळवे, गायकवाड आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post