महायुतीचे सरकारच नगरचा विकास करु शकते : दिलीप गांधी


एएमसी मिरर : नगर
खासदार म्हणून काम करतांना नगर शहर व जिल्ह्यात अनेक विकासकामे केली. शहरात विविध योजना राबवून विकासाची दिशा दिली. पुढील काळात आपल्या शहराला महानगरचा लूक देण्याची गरज आहे. त्यासाठी भाजप-सेना युतीचे उमेदवार अनिल राठोड विधानसभेत निवडून आणणे आवश्यक आहे. भाजप-शिवसेना युतीचे सरकारच नगरचा विकास करु शकते. मतदारांनी मोठ्या मताधिक्क्याने अनिल राठोड यांना निवडून द्यावे, असे आवाहन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी केले.


महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ शिवसेना व भाजप पदाधिकार्‍यांनी मार्केटयार्डमध्ये प्रचार फेरी काढून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. गांधी, राठोड यांच्यासह माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभय आगरकर, संभाजी कदम, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, किशोर बोरा, दत्ता कावरे, परेश लोखंडे, विवेक नाईक, शांतीलाल गुगळे, अजय बोरा, समीर बोरा, नितीन चंगेडिया, ऋषभ भंडारी आदी उपस्थित होते.
दिलीप गांधी म्हणाले की, देशात आणि राज्यात भाजप-शिवसेनेच्या सरकाराने गेल्या पाच वर्षात सर्वसामान्यांच्या विकासासाठी विविध योजना राबविल्या. सर्वसामान्यांच्या जीवनात बदल झाले. त्यांचे जीवनमान उंचावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृरदृष्टीमुळे देश सर्वच क्षेत्रात मोठी प्रगती करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकावर नेऊन ठेवले आहे. सरकारच्या विकासाच्या कामांमुळे लोकसभेला नागरिकांनी पुन्हा एकदा भाजप-शिवसेनेला संधी दिली. आताही विधानसभेत भाजप-सेनेचीच सत्ता येणार आहे. नगरमध्येही भाजप-सेना महायुतीचे कार्यकर्ते एकदिलाने काम करत आहेत. शिवसेनेचे उमेदवार अनिल राठोड यांच्या विजयासाठी सर्वजण प्रयत्नशील आहेत. त्यामुळे आमचा विजय पक्का आहे, असा दावाही दिलीप गांधी यांनी केला.Post a Comment

Previous Post Next Post