शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट


एएमसी मिरर : वेब न्यूज
विधिमंडळ गटनेतेपदाच्या निवडीनंतर शिवसेनेच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात आदित्य ठाकरे, रामदास कदम, एकनाथ शिंदे, निलम गोऱ्हे आणि दिवाकर रावते यांचा समावेश होता. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपामध्ये सध्या तणावाचे वातारण असल्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर आदित्य ठाकरे म्हणाले, सरकार स्थापनेबाबत उद्धव ठाकरे जे बोलतील तो शेवटचा शब्द असेल. अतिवृष्टीमुळे पीडित असलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळावी या मागणीसाठी आम्ही सर्व ६३ आमदारांनी राज्यापालांची भेट घेतली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना मदत मिळावी अशी विनंती आम्ही त्यांना केली. यावेळी राज्यपालांनी आम्हाला राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे,असे त्यांनी म्हटले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post