शिवसेनेची विधानसभेतील आमदारांची संख्या पोहोचली 60 वर


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेनेची विधानसभेतील आमदारांची संख्या 60 वर पोहोचली आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले आहेत. तर चार अपक्ष आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिल्यांनी शिवसेनेच्या आमदारांची संख्या 60 पोहोचली आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मातोश्रीवर भेट घेऊन प्रहार जनशक्तीच्या दोन आमदारांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार बच्चू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
विधानसभा निवडणुक निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यावर आता प्रहर जनशक्तीच्याही दोन आमदारांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलांय. त्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्या आता 60 झाली आहे.
शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतची कामे रोहयोतून व्हावीत. दिव्यांग आणि आदिवासी बांधवांच्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करणे, अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघातील समस्या सोडवणे. अशा अनेक मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्यानंतर शिवसेनेला पाठिंबा दिला असल्याचे बच्चू कडू यांनी
सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post