युतीत राहण्यातच राज्याचं भलं आहे : संजय राऊत


एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्राची कुंडली आम्हीच बनवणार. कुठले ग्रह कुठे ठेवायचे, कुठले तारे जमिनीवर आणायचे, कुठले चमकावायचे ती ताकत शिवसेनेमध्ये आहे, असा दावा शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. युतीत राहण्यातच राज्याचं भलं आहे, पण योग्य तो सन्मान राखाला जावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
सरकार स्थापनेची घाई करुन चालणार नाही. शातं, थंड डोक्याने महाराष्ट्राच्या हिताचा विचार करुन काही निर्णय घ्यावे लागतील. त्यासाठी उद्धव ठाकरे समर्थ आहेत. ठरल्याप्रमाणे सगळं घडलं तर येणार सरकार स्थिर असेल, असे संजय राऊत म्हणाले.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी सरकार स्थापनेसंबंधी लिखित स्वरुपात द्या असे सांगितले होते. त्यामुळे ती पक्षाची भूमिका आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले. ज्यांच्याकडे १४५ बहुमत आहे ते कोणीही राज्याचे मुख्यमंत्री बनू शकतात असे राऊत म्हणाले. शिवसेनेलासोबत घेऊन सरकार स्थापन करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यावर पत्रकारांनी राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, फडणवीसांची भावना चांगली आहे. फक्त ठरल्याप्रमाणे घडू द्या म्हणजे झालं.
शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असं कोणी म्हणत असेल तर मी सुद्धा माझ्या संपर्कात आमदार आहेत असं म्हणू शकतो. यापुढे कुठल्या आमदार फुटेल असं वाटत नाही असे राऊत म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post