मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेचा पराभवएएमसी मिरर : वेब न्यूज
मातोश्रींच्या अंगणातचं शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पराभवचा सामना करावा लागला आहे. या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार झिशान सिद्दीकी विजयी झाले आहेत. शिवसेनेचे विद्यमान आमदार तृप्ती सावंत यांना शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने शिवसेनेला या पराभवाला सामोरे जावं लागलं असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेतील अंतर्गत बंडखोरीमुळे शिवसेनेला पराभव पत्करावा लागला आहे. वांद्रे पूर्वचे विजयी आमदार झिशान सिद्दीकी काँग्रेस नेते बाबा सिद्दीकी यांचा मुलगा आहे. शिवसेनेने विद्यमान आमदार अशोक पाटील आणि तृप्ती सावंत यांना डावलून विश्वनाथ महाडेश्वरांना तिकीट दिली होती.
वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या झिशान सिद्दीकी यांना 37,636 मतं मिळाली, तर शिवसेनेच्या विश्वनाथ महाडेश्वरांना 23,069 मतं मिळाली आहेत. शिवसेनेच्या पराभवामागचं मुख्य कारण म्हणजे शिवसेच्या बडखोर तृप्ती सावंत यांना 23,856 मतं मिळाली. तर मनसेच्या अखिल चित्रे यांना 10,403 मतं मिळाली. दरम्यान शिवसेनेचे विद्यमान तृप्ती सावंत यांनी उमेदवारी नाकारल्या नंतर या समर्थकांसह मातोश्रीबाहेर रात्री ठिय्या मांडला होता. तृप्ती सावंत यांच्या जागेवर मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी देण्यात होती. या आंदोलनानंतर पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड देखील करण्यात आली होती. त्यानंतर काही शिवसेनेकडून तृप्ती सावंत यांना बेदखल करण्यात आलं होतं.

दरम्यान हा मतदारसंघ गेल्या 2014 च्या निवडणुकीत सर्वांत जास्त चर्चेत राहिला. यावेळी प्रकाश उर्फ बाळा सावंत हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. मात्र, 2015 मध्ये त्यांचं निधन झालं. या पार्श्वभूमीवर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आल्या. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या नारायण राणेंचा त्यांनी 20 हजार मतांनी पराभव केला होता. या पोटनिवडणुकीत थेट मातोश्रीच्या अंगणातला गड जिंकण्यासाठी काँग्रेसकडून नारायण राणे शड्डू ठोकून उभे राहिले खरे. मात्र, नारायण राणेंना शिवसेनेनं मातोश्रीच्या अंगणातच आस्मान दाखवलं आणि त्यांच्या राजकिय कारकिर्दीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं. बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांचा शिवसेनेकडून पोटनिवडणुकीत विजय झाल्यानंतर शिवसैनिकांनी केलेला जल्लोष आणि नारायण राणेंची उडवलेली खिल्ली कुणालाही विसरता येणार नाही.


Post a Comment

Previous Post Next Post