भुलथापांना बळी न पडता महायुतीला मतदान करावे : अनिल राठोड


एएमसी मिरर : नगर
पाणी, रस्ते, ड्रेनेज, लाईट या मुलभूत सुविधा हा नागरिकांचा हक्क आहे. त्यामुळे यासाठी आपले कायम प्राधान्य राहिले आहे. शिवसेनेचे नगरसेवक हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतीलच, परंतु शहराच्या विकासात भर घालणारे विविध मोठे प्रकल्प उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी सत्ता असणे आवश्यक आहे. आज केंद्रात भाजप-सेनेची सत्ता आहे आणि महाराष्ट्रातही महायुतीची सत्ता येणार आहे. त्यामुळे कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता धनुष्यबाणाला मतदान करुन मोठ्या मताधिक्यांनी विजयी करावे, असे आवाहन शिवसेना उमेदवार अनिल राठोड यांनी केले.


महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ प्रभाग 8 व 15 मध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी नगरसेवक सचिन शिंदे, अनिल बोरुडे, श्याम नळकांडे, संजय शेंडगे, अनिल शिंदे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, दिपक खैरे, विजय पठारे, अर्जुन दातरंगे, संजय सागावकर, हर्षवर्धन कोतकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.
अनिल राठोड म्हणाले की, कल्याण रोड परिसर हां शहराच्या सर्वात जवळचा भाग आहे. येथे वसाहती वाढत आहेत. लोकवस्ती विस्तारात आहे. परंतु त्या प्रमाणात सुविधा पुरेशा प्रमाणात नाहीत. या भागाचा सर्वांगिण विकास करण्याचे आश्‍वासन आपण मनपा निवडणुकीत दिले होते. त्यामुळेच आपणा सर्वांच्या आशिर्वादाने या भागातून शिवसेनेच्या उमेदवारांना भरघोस मतदान करुन प्रभाग 8 व 15 मधील सर्वच्या सर्व आठही नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले आहेत. गेल्या वर्षभरात वेगवेगळ्या आचारसंहितेमुळे विकास कामे होऊ शकली नाहीत. परंतु पुढील काळात या भागात मोठी विकास कामे होणार आहेत. या भागाच्या विकासासाठी हे सर्व नगरसेवक कटीबद्ध राहणार आहेत. ज्याप्रमाणे मनपा निवडणुकीत शिवसेनेच्या मागे आपण ठामपणे उभे राहिलात आताही महायुतीचे मागे उभे रहावे, असे आवाहन राठोड यांनी केले.


Post a Comment

Previous Post Next Post