सर्वसामान्य जनता हीच शिवसेनेची ताकद : अंबादास पंधाडे


एएमसी मिरर : नगर
भगवा या मराठी मातीचा इतिहास आहे. तुमचा आमचा श्वास भगवा, तुमचा आमचा ध्यास भगवा आहे. सवर्सामान्य मावळे ही शिवाजी महाराजांची ताकद होती. शिवसेनेची ताकद ही सर्वसामान्य जनताच आहे. येत्या निवडणुकीत 75 टक्के मतदान शिवसेनेच्या उमेदवाराला होणार आहे, असा विश्वास शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अंबादास पंधाडे यांनी व्यक्त केला.
शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ प्रभाग दहा व अकरामध्ये प्रचार फेरी काढून नागरिकांशी संवाद साधण्यात आला. यावेळी अंबादास पंधाडे, लंकेश हरबा, विजय वर्मा, सतीष मैड, समीर बोरा, जसपाल पंजाबी, भाऊसाहेब उनवणे, सुभाष आनेचा, मुन्ना भिंगारदिवे, शाम सोनवणे, किरण शेटे, समीर दळवी, बंटी डापसे, अनिल गट्टाणी, प्रसाद भोसले, रेखा हरबा, ज्योती गोयल, नीता पवार, अमित लद्दा, वैभव जंबूरे, घनशाम हिरणवाळे, दिपक आगरवाल, अरुणा गोयल, चंद्रकांत मिरांडे, रवी चव्हाण, विशाल वालकर, महावीर कांकरिया, राजू परीक आदी उपस्थित होते.
लंकेश हरबा म्हणाले, प्रभाग दहा व अकरामध्ये अनिल राठोड यांना मोठ्या मताधिक्याने मतदान घडून आण्यासाठी आम्ही महायुतीचे कार्यकर्ते कटीबद्ध आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post