नगर : श्रीपाद छिंदम ‘बसपा’कडून विधानसभेच्या रिंगणात


एएमसी मिरर : नगर
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेले नगर महापालिकेचे नगरसेवक श्रीपाद छिंदम यांना नगर शहर मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. पक्षाकडून ‘एबी’ फार्म मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले असून, आज (शुक्रवारी) उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचेही छिंदम यांनी स्पष्ट केले आहे.
छिंदम यांना वादग्रस्त वक्तव्यामुळे उपमहापौर पद गमवावे लागले होते. त्यानंतर मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. त्यात त्यांनी शिवसेना, भाजपच्या उमेदवारांवर मात केली. आता त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. बहुजन समाज पक्षाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post