निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्‍य उत्‍पादन शुल्‍कची धडक कारवाई; 22 अनुज्ञपती तात्‍काळ बंद


एएमसी मिरर : नगर
भारत निवडणूक आयोगाच्‍या निर्देशानुसार विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरु झाल्‍यापासून अहमदनगर राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाने 186 गुन्‍हयामध्‍ये 141 आरोपींना अटक केली. तसेच 24 वाहने जप्‍त केली असून असे एकूण 36 लाख 41 हजार 597 रुपयांचा मुद्देमाल व 5,650.27 बल्‍कलिटर मद्य जप्‍त करण्‍यात आलेला आहे.
विधानसभा निवडणूकीच्‍या काळात अवैद्य दारु विक्री मोठया प्रमाणात होत असते. या पार्श्‍वभूमीवर जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी, राज्‍य उत्‍पादन पुणे विभागाचे उपआयुक्‍त प्रसाद सुर्वे यांच्‍या निर्देशानुसार अहमदनगर राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागाचे अधीक्षक पराग नवलकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात आचारसंहितेच्‍या कालावधीत या विभागामार्फत अनुज्ञप्‍तीचे सखोल निरीक्षण करण्यात आले. यात अनुज्ञप्‍तीमध्‍ये अनियमितता आढळून आल्‍याने त्‍यांच्‍याविरुध्‍द विभागीय प्रकरण नोंदविण्‍यात आले असून 22 अनुज्ञप्‍त्‍या नियमबाहय मद्य विक्री केल्‍यामुळे जिल्‍हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी तात्‍काळ बंद केल्‍या असून त्‍यांना तीन दिवसाच्‍या आत उत्‍तर देण्‍याचे आदेश दिले आहेत.

बंद केलेल्या अनुज्ञप्‍त्‍या पुढीलप्रमाणे :
मे.सी के वाईन्‍स, एफएल-2 क्र.11 श्रीरामपूर, आर व्‍ही गायकवाड, सीएल-3 क्र. 50 कोपरगाव, श्री बी एम मोटे, सीएल-3 क्र.84 ता.नेवासा, श्री राहुल उगले सीएल-3 क्र. 95 देहरे ता. नगर, श्री एस ए पटेल, सीएल-3,क्र.92 ता.नेवासा, श्री बी एम कलाल सीएल-3 क्र.115 ता.नेवासा, श्री एच एस खेमनर, सीएल-3 क्र. 69 ता.संगमनेर, श्री सातभाई फडणवीस,सीएल-3 क्र.34 चासनळी ता.कोपरगाव, श्री आर के गटागट, सीएल-3 क्र.45 ता.पाथर्डी, हॉटेल अपना एफएल-3 क्र. 92 ता. कोपरगाव, हॉटेल बाबज, एफएल-3 क्र.481 ता. कोपरगाव, हॉटेल विजय एफएल-3 क्र.201 ता.जि.अहमदनगर, हॉटेल कमलेश एफएल-3 क्र.678 ता. संगमनेर, हॉटेल द्वारका एफएल-3 क्र. 217 ता. कोपरगाव, हॉटेल न्‍यू विजयसुख, एफएल-3 क्र. 614 ता. राहुरी, हॉटेल अतिथी एफएल-3 क्र. 180 ता.अकोले, हॉटेल संजोग एलएल-3 क्र.453 ता.जि.अहमदनगर, हॉटेल सुरज एलएल-3 क्र.713 ता.जि.अहमदनगर, हॉटेल मान एफएल-3 क्र. 601 ता. श्रीरामपूर, हॉटेल पिंगारा एलएल-3 क्र.739 ता.जि.अहमदनगर, हॉटेल मातोश्री एलएल-3 क्र.399 ता.जि.अहमदनगर व हॉटेल इंद्रायणी एलएल-3 क्र. 643 ता.जि.अहमदनगर.


Post a Comment

Previous Post Next Post