विरोधी पक्षनेते पदासाठी ही नावं चर्चेत!


 
एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी महायुतीच्या बाजूने कलं दिला आहे. शिवसेना-भाजपा युतीने सरकार स्थापन केल्यास आघाडीला विरोधीपक्षाच्या बाकावर बसावं लागणार आहे. शिवसेना-राष्ट्रवादी असं सत्तेचं समीकरण समोर आलं असले तरीही त्याची शक्यता कमीच वाटतेय. त्यामुळे आघाडी विरोधीपक्षाच्या भूमिकेत आपल्याला पहायला मिळू शकते. राष्ट्रवादीच्या जागा जास्त असल्यामुळे विरोधीपक्ष नेते पदाचा मान त्यांच्याकडे जाईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उत्स्फुर्ततेने लढत भाजपा-शिवसेनेसमोर अडचणी वाढवल्या आहेत. दोन्ही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू असताना राज्याचा विरोधी पक्ष नेता कोण यावरून आता चर्चा रंगू लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची यादी पाहता विरोधी पक्ष नेता कोण याची उत्सुकता वाढली. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सांगतील तोच विरोधी पक्ष नेता हे नक्की आहे. धनंजय मुंडे, अजित पवार, जितेंद्र आव्हाड, जंयत पाटील, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये रेस आहे.
महाराष्ट्रामध्ये १०५ जागांसह भाजपा क्रमांक एकचा पक्ष ठरला. तर ५६ जागांसह शिवसेना दुसऱ्या आणि ५४ जागांसह राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रामध्ये आता सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेला आता वेग आला असून पक्षांच्या बैठका सुरू झाल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post