नगर : तीन उमेदवारांचे अर्ज बाद; माघारीकडे लक्ष


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीसाठी नगर शहर विधानसभा मतदारसंघातून १७ उमेदवारांनी २१ अर्ज दाखल केले होते. यात सहा राजकीय पक्षांसह तब्बल ११ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे. त्यातील तीन अपक्ष उमेदवारांचे अर्ज छाननीमध्ये बाद झाले आहेत.
निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शुक्रवारी अंतिम मुदत होती. शुक्रवार अखेर एकूण १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार संग्राम जगताप, शिवसेनेकडून माजी आमदार अनिल राठोड, कम्युनिस्ट पक्षाकडून बहिरुनाथ वाकळे, वंचित बहुजन आघाडीकडून किरण काळे, मनसेकडून संतोष नामदेव वाकळे, तर बसपाकडून नगरसेवक श्रीपाद छिंदम आदींचा समावेश आहे. श्रीराम येंडे, श्रीधर दरेकर, संदीप सकट, संजय कांबळे, राजू गुजर, सुनील फुलसौंदर, सचिन राठोड, सुरेश गायकवाड, प्रतिक बारसे, सुभाष शिंदे, नगरसेवक मीर आसिफ सुलतान आदी ११ उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते.
शनिवारी सकाळी छाननी प्रक्रीया पार पडली. यात अपक्ष उमेदवार सुरेश गायकवाड, राजू गुजर व सुभाष शिंदे या तिघांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे आता १४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. माघारीसाठी ७ ऑक्टोबरपर्यंत मुदत असून, त्यानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post