विकासावर चर्चेचे जगतापांनी दिलेले आव्हान राठोड स्वीकारणार का?


एएमसी मिरर : नगर
शहरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. प्रचार फेऱ्या, चौक सभांना सुरुवात झाली आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. त्यात विकासाचा मुद्दाही कधी नव्हे एवढा चर्चेत आला आहे.
माजी आमदार अनिल राठोड यांनी विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्यावर टीका करताना मागील पाच वर्षात शहराची दुरवस्था झाल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे आमदार संग्राम जगताप यांनी मात्र शहरातील प्रत्येक प्रभागात विकासकामे केल्याचा दावा केला आहे. २५ वर्षातील एक काम दाखवा, आज मी केली २५ कामे दाखविण्यास तयार आहे. विकासकामावर समोरासमोर चर्चा करण्याची आपली केव्हाही तयारी आहे, असे आव्हानही जगताप यांनी पहिल्याच मेळाव्यात दिले होते. विकासाच्या मुद्द्यावर आरोप प्रत्यारोप होत असताना जगतापांनी दिलेले आव्हान राठोड स्वीकारणार का? याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post