अजित पवारांच्या 'त्या' पत्रामुळे रोहित पवार अडचणीत!
एएमसी मिरर : वेब न्यूज
कर्जत-जामखेड मतदारसंघात जलसंधारण मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्यातील हाय व्होलटेज लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. निवडणुकीत रोज नवीन मुद्दे पुढे येत आहेत. आता कुकडीच्या पाण्यावरून भाजपाने राष्ट्रवादीला चांगलेच अडचणीत आणल्याचे चित्र आहे.
कुकडीचे पाणी जामखेडला देता येणार नसल्याचे तत्कालीन मंत्री अजित पवार यांचे एक पत्र सोशल मीडियात व्हायरल झाले असून, यामुळे पवारांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
कुकडीचे पाणी हा या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. 18 वर्षांपूर्वी 28 नोव्हेंबर 2001 रोजी अजित पवार यांनी तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांना पत्र पाठवून 'कुकडी प्रकल्पांतर्गत उपलब्ध असलेल्या वापराच्या पाण्याचे पूर्ण नियोजन झाले असल्याने जामखेड तालुक्याला पाणी देण्याची पूर्ण करता येणार नाही', असे स्पष्ट केले होते. सध्या ते पत्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाले आहे. जामखेडला रोहित पवार चांगलेच अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांनी ज्या-ज्या वेळी कुकडीचे पाणी मागितले त्या-त्या वेळी राष्ट्रवादीचा आमदार निवडून द्या, कुकडीचे पाणी देतो, राष्ट्रवादीचा खासदार निवडून द्या, कुकडीचे पाणी देतो, जि.प.,पं.स. उमेदवार निवडून द्या कुकडीचे पाणी देतो, अशा अटी-शर्ती अजित पवारांनी जामखेडच्या जनतेला घालत मते मिळविण्याचा प्रयत्न केला. त्यांनी जनतेच्या डोळ्यांत धूळफेक केल्याचा आरोप आता भाजपाकडून केला जात आहे.
पालकमंत्री राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यातील गेल्या 40 वर्षांचा प्रलंबित असलेला तुकाई चारीचा प्रश्र मार्गी लावला. वर्षापूर्वी कुकडी प्रकल्याला सुधारित प्रशासकीय मंजुरी घेताना तुकाई चारीला मंजुरी मिळवली. यामुळे कर्जतचा उत्तरेकडील उर्वरित भाग सिंचनाखाली येणार आहे. त्याचबरोबर जामखेड तालुक्यातील जवळा आणि आगी या सीना नदीवर दोन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचा समावेश कुकडी लाभक्षेत्रात केला. या माध्यमातून येत्या काळात जवळा, आगी, मतेवाडी, दिघी (ता.कर्जत), खडकी (ता.करमाळा) येथील हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. ही वस्तुस्थिती असताना कर्जत-जामखेडला कुकडीचे हक्काचे पाणी मिळवून देण्याची भाषा रोहित पवार कोणत्या तोंडाने करत आहेत? असा सवालही भाजपा समर्थकांकडून होत आहे. आजपर्यंत कर्जत जामखेडला हक्काच्या पाण्यावाचून वंचित ठेवायला हेच आणि आज निवडणुकीच्या जनतेची दिशाभूल करण्याचे काम हेच करत असल्याचेही भाजपाकडून सांगितले जात आहे.
भाजप सरकारला हे शक्य झाले, अजित पवारांना का शक्य झाले नाही? कर्जत-जामखेड तालुक्यांना कुकडीचे पाणी देण्याची पवारांची मानसिकताच नव्हती. त्यामुळे रोहित पवारांना कर्जत-जामखेडच्या पाणीप्रश्रावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही भाजप कार्यकर्ते म्हणत आहेत. अजित पवारांनी कुकडीच्या पाण्याबाबत दिलेले हे पत्र चांगलेच व्हायरल झाले आहे. त्यामुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Post a Comment

Previous Post Next Post