निवडणुकीनंतर शरद पवार यांना राजकारणातून निवृत्ती देणार : चंद्रकांत पाटील


एएमसी मिरर : वेब न्यूज 
विधानसभा निवडणुकीनंतर राजकारण आणि समाजकारण यातून शरद पवार यांना कायमची निवृत्ती देणार असल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील सभेत केले आहे.
राधानगरी मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील राधानगरी तुरंबे या ठिकाणी आले होते. त्यावेळी आयोजित सभेत बोलतांना त्यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, मला कोथरुडमध्ये अडकवून ठेवण्यासाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना साधा उमेदवार देता आला नाही. त्यावरुन त्यांच्या पक्षांची ताकद किती उरली आहे ते कळून येते. मी कोथरुडमधून निवडून येणार हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post