व्हिडीओ व्हायरल : पाथर्डीत मतदान गोपनियतेचा भंग; जिल्हाधिकार्‍यांचे चौकशीचे आदेश


एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत असून, नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान करत असतांनाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी याची गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.
मतदान गोपनियतेचा भंग होऊ नये, यासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करतांना मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात कॅमेरे व मोबाईल बाळगण्यास व वापरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. मात्र, पाथर्डी तालुक्यातील एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, यात मतदान ईव्हीएमवर मतदान करतांनाचे व व्हीव्हीपॅट मधून स्लिप बाहेर आल्याचे दृष्य दिसत आहे. ईव्हीएम मशिनवर 162 - डांगेवाडी असे स्टिकर लावण्यात आल्याचे दिसत आहे. या प्रकाराची जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती ‘मिडीया सेल’कडून देण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post