एएमसी मिरर : नगर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या असून, 3 ऑक्टोबर रोजी उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा बहुजन समाज पार्टी लढविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष उमाशंकर यादव यांनी दिली.
बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा कुमारी मायावती, महाराष्ट्र राज्याचे प्रभारी तथा राष्ट्रीय महासचिव रामआचल, खासदार डॉ. अशोक सिद्धार्थ, प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष दयानंद किरतकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी जाहीर केली जाणार आहे. नगर जिल्ह्याचे प्रभारी बापूसाहेब कुदळे, बाळासाहेब आवारे, प्रशांत कसबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेण्यात आल्या. जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक विधानसभेतील उमेदवारांची पडताळणी करण्यात आली. या विधानसभेत सर्व जागांवर बहुजन समाज पार्टी सक्षम उमेदवार देणार असून, उमेदवारासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचे जिल्हा महासचिव राजू शिंदे व जिल्हा प्रभारी संजय डहाणे यांनी स्पष्ट केले आहे.
Post a Comment