तरुणाचा दोरीने गळा आवळून खून


एएमसी मिरर : वेब न्यूज
कन्नड तालुक्यातील गुदमातांडा येथील एका पंधरा वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री (ता.७) उघडकीस आली. आज (ता. ८ ) ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुदमातांडा येथील राहिवशी नारायण फत्तू राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी संध्याकाळी शेतातून घरी आल्यावर बघितले असता मुलगा कौतिक नारायण राठोड (वय १५) घरी आलेला दिसला नाही. म्हणून शोधाशोध केली असता चिंचखेडा शिवरातील गायरान तळ्‍याजवळ मुलगा पडलेला दिसला. जवळ जावून बघितल्यावर त्याच्‍या उजव्या डोळयास जखम झालेली दिसली. यावेळी नातेवाईक व गावचे पोलिस पाटील यांना मुलाचा घातपात झाल्याची खात्री पटल्याने त्‍यांनी तात्काळ ही खबर ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. यानंतर उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश सातव, पोलिस निरीक्षक सुनील नेवसे, उपनिरीक्षक बजरंग कुटुंबरे, मनोज घोडके यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला.
नारायण फत्तू राठोड यांनी नारायण फत्तू राठोड राहुल सुबाराम जाधव (वय २५) व मोतीराम सुबाराम जाधव (वय १२) शिरपूर, जिल्ह्य धुळे आदिवासी (पावरा) समाजाचे सध्या गुदमातांडा येथील गायरानमध्ये झोपड़ी करून राहतात. त्यांच्यात व मयत कौतिक राठोड यांच्यात चांगली मैत्री होती. ते सोबत बकऱ्या चारन्यासाठी जंगलात जात असत. घटनेच्या दिवशी ही हे सोबत होते. तसेच आपल्‍या मुलाचा खून यांनीच केल्‍याचा संशय व्‍यक्‍त केला आहे. यामुळे पोलिसांनी दोघांना ताब्‍यात घेत कलम ३०२,३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कोणत्या करणाने खून करण्यात आला हे निष्पन्न झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post