महाविकास आघाडीनंतर भाजपची पत्रकार परिषद; भूमिका स्पष्ट करणार


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : अजित पवार यांनी आज (ता.२३) सकाळी राजभवनात भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडवून आणला. या घटनेनंतर आज साडेबारा वाजता शरद पवार व उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली. यानंतर आज दुपारी आडीच वाजता भाजपची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्‍ये भाजप आपली भूमिका स्‍पष्‍ट करेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. या पत्रकार परिषदेला भाजपचे कोणते नेते उपस्‍थित राहणार याविषयी आतापर्यंत माहिती मिळालेली नाही.
महाराष्ट्रातील राजकीय क्षेत्रात आज अनपेक्षित घडामोडी घडल्या. भाजपचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनवर पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचे विधीमंडळ नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर आज वाय. बी. सेंटरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाजपवर जोरदार प्रहार केला. पाकिस्तानवर जसा सर्जिकल स्ट्राइक केला तसा महाराष्ट्रावर केंद्र सरकारने फर्जिकल स्ट्राईक केला, अशी टीका त्यांनी केंद्रातील भाजप सरकारवर केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post