छत्रपती शिवरायांचा अवमान, केबीसीला विरोध


एएमसी मिरर : वेब न्यूज
'कौन बनेगा करोडपती ११' बंद करण्याची मागणी सोशल मीडियावर होत आहे. सोशल मीडियावर हा शो बायकॉट करण्याची मागणी होत असून '#Boycott KBC SonyTv' असा ट्रेंड सोशल मीडियावर सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने यूजर्स या शोचा विरोध करत आहेत. शोविरोधात अनेक पोस्ट समोर येत आहे.
केबीसीच्या ६ नोव्हेबरच्या एपिसोडमध्ये शाहेदा चंद्रन स्पर्धक होत्या. स्पर्धेदरम्यान अमिताभ बच्चन यांनी त्यांना अनेक प्रश्न विचारले. योग्य उत्तरे देऊन शाहेदा यांनी खेळ पुढे नेला. परंतु, १ लाख ६० हजार रुपयांसाठी जो प्रश्न आला, त्यावर शाहेदा थांबल्या. कारण, याचे उत्तर त्यांना माहिती नव्हते. या प्रश्नासाठी त्यांनी एक्सपर्ट ॲडव्हाईज घेतले. एक्सपर्टने या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊन १ लाख ६० लाख रुपये जिंकले.

प्रश्न होता-'इनमें से कौन से शासक मुगल सम्राट औरंगजेब के समकालीन थे ?' या प्रश्नाच्या उत्तरासाठी ऑप्शन होते- 'A- महाराणा प्रताप' 'B- राणा सांगा' 'C- महाराजा रणजीत सिंह' 'D- शिवाजी'...

या प्रश्नावरून आता शोचा विरोध होत आहे. शोमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी नावाने उल्लेख करून त्यांचा अवमान केला आहे. तसेच शो ने 'क्रूर औरंगजेबाला मुगल सम्राट आणि स्वराज्य संस्थापकाला केवळ एकेरी नावाने संबोधले असल्याचे युजर्सनी म्हटले आहे.' या वरून आता केबीसीचा विरोध होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post