अजित पवार महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री; बारामतीत झळकले पोस्टर


एएमसी मिरर वेब टीम 
बारामती : भाजपा पाठिंबा देण्याचा निर्णय घेत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेला धक्कादायक वळण देणाऱ्या अजित पवार यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला होता. मात्र, मंगळवारी झालेल्या नाट्यमय घडामोडींनंतर अजित पवार पुन्हा राष्ट्रवादीत परतले. बुधवारी झालेल्या पक्षाच्या आणि महाविकास आघाडीच्या बैठकींनाही त्यांनी हजेरी लावली. दरम्यान, अजित पवार यांच्या समर्थनार्थ बारामतीत पोस्टर झळकले आहेत. 
"आपण काय करायचं याचा निर्णय आता आम्हाला घेऊ द्या. भावी मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडं पाहतोय," अशा आशयाचे पोस्टर बारामतीत लावण्यात आले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post