जम्मू- काश्मीरमधील चकमकीत उचगावचा जवान शहीद


एएमसी मिरर : वेब न्यूज
जम्मू -काश्मीर येथील पूंछ भागात गुरुवारी रात्री झालेल्या चकमकीत बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील जवान शहीद झाला. राहुल भैरू सुळगेकर (वय २४, रा मारुती गल्ली, उचगाव) असे शहीद जवानाचे नाव आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे बंदोबस्तावर असलेल्या जवानांची गुरुवारी रात्री दहशतवाद्यांबरोबर चकमक उडाली. यामध्ये बेळगाव तालुक्यातील उचगाव येथील जवान शहीद झाल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली आहे. राहुल हे चार वर्षांपूर्वी मराठा लाईट इन्फंट्रीतून सैन्य दलात भरती झाले होते. त्यांचे वडील सैन्यदलातून निवृत्त झाले असून राहुल यांचा मोठा भाऊ मयूर हे देखील सैन्यदलात कार्यरत आहेत. ते शाहिद झाल्याचे वृत्त उचगाव येथे येऊन धडकल्यानंतर गावावर शोककळा पसरली.
शुक्रवारी सायंकाळपर्यंत राहुल यांचे पार्थिव उचगाव येथे पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Post a Comment

Previous Post Next Post