चर्चेत येण्याचा बिचुकलेचा नवा फंडा; म्हणे सत्तास्थापनेचा दावा करणार
एएमसी मिरर : वेब न्यूज 
महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागून 16 दिवस झाले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. भाजप शिवसेनेच्या महायुतीतील तिढ्यामुळे सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा होऊ झालेला नाही. दररोज नवनवीन घडामोडींमुळे राज्यभरात संभ्रम निर्माण झालेला असतानाच आता बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी चर्चेत येण्यासाठी नवा फंडा अजमावला आहे. बिचकुले यांनी राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगत खळबळ उडविली आहे. या संदर्भात त्यांनी राज्यातील सर्व आमदारांना एक पत्र लिहिले आहे. बिचुकले यांनी राज्यातील समस्त नवनिर्वाचित आमदारांना पत्र पाठवून आपल्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. येत्या दोन दिवसांत आपण महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे बिचुकलेंनी या पत्रात म्हणाले आहेत. यासोबतच जात, धर्म आणि पक्ष बाजूला ठेऊन मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला पाठिंबा द्यावा आणि मंत्रिमंडळामध्ये योग्य मंत्रिपदावर विराजमान व्हावे, असे देखील आवाहन बिचुकले यांनी पत्रामार्फत राज्यातील नवनिर्वाचित आमदारांना केले आहे.
अशा स्वार्थी पक्षप्रमुखांच्या नादाला लागण्यापेक्षा माझ्या बरोबर यावे हीच अपेक्षा. मी येणाऱ्या दोन दिवसांत राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे, असे बिचुकले यांनी पत्रात म्हटले आहे. बिचकुले यांनी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली होती. बिचुकले यांच्या आधी बीडच्या एका युवकाने देखील मुख्यमंत्री पदाचा तिढा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत माझ्याकडे पदभार द्या, अशी मागणी राज्यपालांकडे केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post