मुकुंदनगरमध्ये नागरी सुविधांचा बोजवारा; आंदोलनाचा इशारा


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : शहरातील प्रभाग 3 मधील मकुंदनगर परिसरात नागरी सुविधांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे विविध समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. कर्मचार्‍यांच्या कामचुकारपणामुळे साफसफाईसह ड्रेनेज दुरुस्ती, पाणीपुरवठा आदी समस्यांबाबत उपाययोजना होत नाहीत. या प्रकरणी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांना निवेदन देण्यात आले असून, आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
नगरसेविका मिनाज खान, नगरसेविका रिजवान शेख यांनी याबाबत निवेदन दिले आहे. यावेळी बाबा खान, फारुक शेख, भाऊ पांडुळे, वसीम पठाण, सोहेल शेख, मुज्जु खान, सायबाज शेख, अरिफ खान, शेख तौसीफ, जादेव शेख आदी उपस्थित होते. मुकुंदनगर भागातील पथदिवे पाच महिन्यांपासून बंद आहेत. कचरा गाडी नियमित वेळेत येत नाही. ड्रेजेन तुंबलेले आहे. कर्मचार्‍यांना फोन केल्यास आमचे काम नाही, असे उलट उत्तर दिले जाते. त्यामुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. याबाबतही लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा सोमवारी महापालिकेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post