दिल्लीगेट रस्त्याच्या कामासाठी आमदार जगताप आक्रमक


एएमसी मिरर : नगर
दिल्लीगेट येथील निलक्रांती चौक रस्त्याचे काम तत्काळ सुरु करावे, या मागणीसाठी आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. त्यांच्या टेबलावर बुटांचा हार ठेवून बांधकाम विभागाचा निषेध केला. आमदार जगताप यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर उद्यापासून (शनिवार) काम सुरु करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
दिल्लीगेट रस्ता अत्यंत खराब झाला आहे. या संदर्भात अगोदरही आमदार संग्राम जगताप यांनी बांधकाम विभागाला पत्र देऊन या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी केली होती. हक्कभंग दाखल करण्याचा इशाराही दिला होता. मात्र बांधकाम विभागाने अद्यापही या रस्त्याचे काम सुरू केले नाही. त्यामुळे आज आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट बांधकाम विभागातील अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
उद्या सकाळी काम चालू करण्याचे लेखी पत्र घेऊन संग्राम जगताप यांनी आपले आंदोलन मागे घेतले. 

Post a Comment

Previous Post Next Post