एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या थकबाकीपोटी महापालिकेकडून कारवाईला सुरूवात झाली असून, शुक्रवारी (दि.22) दोन थकबाकीदारांच्या मालमत्तांना टाळे ठोकण्यात आले आहे. तर दोन थकबाकीदारांनी 8 लाख रुपये जमा केल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली आहे.
सावेडी प्रभाग कार्यालयाने बलभीम दौलतराव पाटील (लक्ष्मीनगर सोसायटी) यांच्याकडे असलेल्या 2 लाख 19 हजार 507 रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांची मालमत्ता सील केली आहे. प्रभाग अधिकारी जितेंद्र सारसर, कर निरीक्षक संजय उमाप, बिठ्ठल बुचकूल, राहुल शेंडे, पाशा शेख, किशोर देठे, देशपांडे आदींनी ही कारवाई केली.
दुसर्या कारवाईत बुुरुडगाव प्रभाग कार्यालयाच्या हद्दीतील भाजीपाला मार्केटमधील मेहबूब करीम बागवान यांचा गाळा सील करण्यात आला आहे. त्यांच्याकडे 1 लाख 12 हजार 73 हजार रुपयांची थकबाकी आहे. प्रभाग अधिकारी नानासाहेब गोसावी, कर निरीक्षक व्ही. जी. जोशी, राजेश सराईकर, हबीब शेख, विजय चौरे यांनी ही कारवाई केली. दरम्यान, नवल मकासरे यांच्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. मात्र, त्यांनी 3 लाख रुपये जमा केले आहेत. तर मार्केटयार्ड मार्केट कमिटीकडून थकबाकीबोटी 5 लाख रुपये वसूल झाल्याने त्यांच्यावरील कारवाई टळल्याचे चित्र आहे. मालमत्ताधारकांनी थकबाकी भरुन जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
Post a Comment