अहमदनगर : मुद्रांक शुल्कापोटी मनपाला 1.48 कोटी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : मुद्रांक शुल्कावरील 1 टक्का अधिभारापोटी वसूल करण्यात आलेली रक्कम शासनाने अनुदान स्वरुपात महापालिकांना वितरीत केली आहे. यात नगर महापालिकेला 1 कोटी 48 लाखांची रक्कम वर्ग करण्यात आली आहे.
राज्यातील 26 महापालिकांना नगरविकास विभागाकडून 206 कोटी रुपये वितरीत करण्यात आले आहेत. मुद्रांक शुल्कावर शासनाकडून जमा करण्यात येणार्‍या 1 टक्का अधिभाराची ही रक्कम संबंधित मनपाला दर दोन-तीन महिन्यांनी वर्ग केली जाते. जुलै व ऑगस्ट 2019 या दोन महिन्यातील रक्कम शासनाने वर्ग केली आहे. यात नगर महापालिकेला 1 कोटी 48 लाख 62 हजार 971 रुपये वर्ग करण्यात आले आहेत. सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यातील रक्कमा मात्र अद्यापही शासनाकडेच प्रलंबित आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post