नगर : तीन लाखांच्या बनावट नोटा पकडल्या


एएमसी मिरर : नगर
श्रीगोंदा तालुक्यातील घोगरगाव येथे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बनावट नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटा घेऊन सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे 2 लाख 83 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. बुधवारी (दि.६) सायंकाळी ही कारवाई झाली.
पारनेर तालुक्यातील सुपे येथील एक व्यक्ती चार चाकी वाहनातून घोगरगाव शिवारात सोने खरेदी करण्यासाठी येणार आहे. त्याच्याकडील नोटा बनावट आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने घोगरगाव शिवारात सापळा रचला. तो अयशस्वी ठरला. त्यानंतर मांडवगण फाटा येथे सापळा रचण्यात आला. सोलापूर-नगर रस्त्यावरून जात असताना संशयित गाडी पोलिसांनी अडविली. गाडीची झडती घेतली असता दोन हजार रुपयांच्या 92 व पाचशे रुपयांच्या 199 अशा 2 लाख 83 हजार रुपये किंमतीच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सतीश गावीत, पोलिस उपनिरीक्षक माळी, पोलिस नाईक विकास वैराळ, अमोल कोतकर, संजय कोतकर, अमोल शिंदे यांनी ही कारवाई केली.

Post a Comment

Previous Post Next Post