अजित पवार यांची पुन्हा विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होणार?


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पुन्हा एकदा विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे. एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. अजित पवार यांनी बंडखोरी करुन उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी विधिमंडळ पक्ष नेतेपदावरुन हटवण्यात आले होते. त्यांच्या जागी जयंत पाटील यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदावर निवड करण्यात आली.
अजित पवार यांनी काल उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यापूर्वी ट्रायडंट हॉटेलमध्ये पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याबरोबर एक बैठक झाली. त्या बैठकीत बंडखोरी मागे घेतल्यास पक्षात योग्य तो सन्मान राखू असा शब्द अजित पवारांना देण्यात आला होता. त्यामुळे आता पुन्हा एकदा अजित पवारांची पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदी निवड होण्याची शक्यता आहे, असे बोलले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post