अजित पवार यांनी घरवापसी करावी : अशोक चव्हाण


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : अजित पवार यांनी राजीनामा देऊन परतलं पाहिजे अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना काय सांगितलं ठाऊक नाही. अजित पवार यांनी राज्यपालांना दिलेल्या पत्राचा काहीही संदर्भ नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी वाय. बी. चव्हाण सेंटरमध्ये जी बैठक बोलावली त्या बैठकीला राष्ट्रवादीचे ५० आमदार हजर होते. तसंच जे अजित पवारांसोबत राजभवन या ठिकाणी गेले होते तेदेखील परतले आहेत. याचाच अर्थ भाजपा आणि अजित पवार गटाकडे संख्याबळ नाही. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अजित पवार यांनी राजीनामा द्यावा आणि घरवापसी करावी असं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post