बलात्कार पीडितेचे अपहरण करून खुनाचा प्रयत्न


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : तोफखाना पोलीस ठाण्यात बलात्काराची फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेला पोत्यात घालून तिचे अपहरण केले. त्यानंतर तिचा खून करण्याच्या उद्देशाने विळद शिवारात फेकून देण्यात आले. काल रात्री ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये तुषार अर्जुन वाघ, बंडू हिराजी मतकर, सुभाष कराळे, अर्जुन वाघ, अरुण मतकर, दिलीप नगरे (सर्व रा. जवखेड खालसा, ता.पाथर्डी, जि.अ.नगर) यांचा समावेश आहे. शेंडी बायपास रोड वडगाव गुप्ता शिवारात व्दारकादास कपडयाचे दुकानाचे शेजारी असलेल्या जागेतून बलात्कार पिडीतेच अपहरण करण्यात आले होते.
एका महिलेने तोफखाना पोलीस स्टेशन येथे काही लोकांविरुद्ध बलात्काराची फिर्याद दिली आहे. त्या रागातून गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जाणाऱ्या पीडितेला आरोपींनी बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या गाडीत घातले. गाडीमध्ये हात-पाय बांधून तिला पोत्यात घालून तिचे जिवे मारण्यासाठी अपहरण केले. त्यानंतर नगर मनमाड रोडला विळद शिवारात सोडून दिले. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post