हा क्षण माझ्यासाठी पूर्णत्वाचा : लालकृष्ण आडवाणी


एएमसी मिरर : वेब न्यूज
भाजपाचे ज्येष्ठ नेते व राम जन्मभूमी आंदोलनातील एक प्रमुख चेहरा म्हणून ओळख असणारे लालकृष्ण आडवाणी यांनी आज राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या ऐतिहासिक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी या निकालाचे स्वागत केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने अयोध्याप्रकरणी दिलेल्या ऐतिहासीक निर्णयाचे मनापासून स्वागत करण्यात मी देशवासीयांबरोबर आहे. हा क्षण माझ्यासाठी पूर्णत्वाचा आहे. मला या जन आंदोलनात माझे नम्र योगदान देण्याची संधी दिल्याबद्दल मी देवाचा आभारी आहे. भारतीय स्वतंत्रता आंदोलनानंतरचे हे सर्वात मोठे आंदोलन होते, असे आडवाणी यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post