तेज प्रताप यादव यांनी दिला एकतेचा संदेश


एएमसी मिरर : वेब न्यूज
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी देखील खास फोटो ट्विट करत निर्णयाचे स्वागत केले.

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या वादावर जो ऐतिहासिक निर्णय दिला आहे, त्याचा मी आदर करतो. मी समस्त देशबांधवांना शांतता आणि सौहार्द टिकवून ठेवण्याचे आवाहन करतो. मंदिर – मशीद हा वाद संपवून आता आपण शाळा, महाविद्यालये, रूग्णालये आणि मुलभूत सुविधांवर चर्चा करायला हवी, असे ट्विट लालू प्रसाद यादव यांचे पुत्र आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांनी केले आहे. त्या सोबतच त्यांनी एकात्मतेचा संदेश देणारा फोटोही ट्विट केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post