भूतकाळात घडलेलं विसरून पुन्हा एकत्र येऊ : मोहन भागवत


एएमसी मिरर : वेब न्यूज
राम जन्मभूमी वादावर सर्वोच्च न्यायालयानं अखेर निकाल दिला. न्यायालयाच्या निर्णयाचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वागत केलं आहे. “न्याय देणाऱ्या निर्णयाचं स्वागत. या दीर्घकालीन प्रक्रियेत बलिदान दिलेल्याचं स्मरण करतो. भूतकाळात घडलेलं विसरून पुन्हा एकत्र येऊ,” असं भागवत म्हणाले.
सरसंघचालक मोहन भागवत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना निर्णयाचं स्वागत केलं. मोहन भागवत म्हणाले, न्याय देणाऱ्या निर्णयाचंं स्वागत. राम मंदिरासाठी ही प्रक्रिया दीर्घकाळ चालली. यासाठी बलिदान दिलेल्याचं आम्ही स्मरण करतो. त्याचप्रमाणे कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवणाऱ्या सर्वांचे आभार. देशवासियांनी या निकालाकडं जय-पराजय म्हणून बघू नये. संविधानाला अनुसरूण संयमानं आनंद साजरा करावा, असं आवाहन त्यांनी केलं. मशिदीसाठी कुठे जागा द्यायची ही सरकारची जबाबदारी आहे. न्यायालयानं सर्व निर्णय दिला आहे. न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर सरकारकडून लवकर कार्यवाही होईल अशी अपेक्षा. भूतकाळ विसरून पुन्हा एकत्र येऊ, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post