राम मंदिराच्या प्रदक्षिणा क्षेत्राबाहेर मशिदीला जागा द्यावी : आरएसएस


एएमसी मिरर : वेब न्यूज
रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने शनिवारी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला. या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मा. गो. वैद्य यांनीही स्वागत केलें. त्याच सोबत त्यांनी एक मागणीदेखील केली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मशिदीला जागा देण्यास हरकत नसावी, परंतु अयोध्येत जागा देताना राम मंदिराच्या प्रदक्षिणेच्या क्षेत्राबाहेर जागा देण्यात यावी. त्यामुळे विवाद उत्पन्न होणार नाहीत, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह मा. गो. वैद्य यांनी दिली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सुप्रीम कोर्टाचा निकाल स्वीकारला आहे. तसेच देशभरातील नागरिकांना शांतता पाळण्याचेही आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post