निकालाचा सन्मान, मात्र समाधान नाही : सुन्नी वक्फ बोर्ड


एएमसी मिरर : वेब न्यूज
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर सुन्नी वक्फ बोर्डाने असमाधान व्यक्त केलं आहे. अयोध्येतील वादग्रस्त जागेबाबत सुप्रीम कोर्टाच्या ऐतिहासिक निकालानंतर सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील जफरयाब जिलानी म्हणाले की, "आम्ही कोर्टाच्या निकालाचा सन्मान करतो, मात्र समाधानी नाही." "बोर्डाने परवानगी दिली तर या निर्णयाविरोधात सुधारणा याचिका (क्युरेटिव्ह पिटीशन) किंवा फेरविचार याचिका (रिव्ह्यू पिटीशन) दाखल करु," असंही जफरयाब जिलानी म्हणाले.
जिलानी म्हणाले की, 'आम्ही या निकालाचा सन्मान करतो, परंतु यावर समाधानी नाही. पुढे काय पावलं उचलायची, यावर निर्णय घेऊ. मुस्लीम पक्षाचे वकील राजीव धवन यांच्याशी चर्चा केल्यानंतर पुढे काय पावलं उचलायची याबाबत निर्णय घेतला नाही. निकालाच्या अभ्यानंतर फेरविचार याचिका दाखल करायची नाही हे निश्चित केलं जाईल."
दुसरीकडे मुस्लीम पक्षकार इकबाल अन्सानी यांनी निकालाचं स्वागत केलं आहे. "आम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा सन्मान करतो. या निकालाविरोधात फेरविचार याचिका दाखल करणार नाही," असंही त्यांनी स्पष्ट केलं.Post a Comment

Previous Post Next Post