निर्णयामुळे भारतीय अस्मिता मजबूत होईल : मुख्यमंत्री फडणवीस


एएमसी मिरर : वेब न्यूज 
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा कुणाचा विजय किंवा पराजय नाही. भारतीय अस्मिता, देशाप्राती आस्था मजबूत करणारा हा निर्णय आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
रामजन्मभूमि प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने आज ऐतिहासिक निकाल दिला आहे. वादग्रस्त जागा राम मंदिराची असून मशिदीसाठी पर्यायी जागा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या आदेशाचा सन्मान करत फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीस म्हणाले की, हा निर्णय भारतीय अस्मिता, आस्था मजबूत करणारा आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा कुणाचा विजय किंवा पराजय नाही. या निर्णयाकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज नाही. जवळ जवळ सर्वांनीच या निर्णयाचे स्वागत केले आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही या निर्णयानंतर चांगले वातावरण पाहायला मिळत आहे. कुठलाही अभिवेष न आणता निर्णय स्वीकारला गेला आहे. राज्याच्या परंपरेचे पालन करत सर्व जण शांतता प्रस्थापित करतील, असा विश्वास आहे. येत्या काही दिवसात विविध धर्म, समाजाचे सन साजरे होत आहेत. तेही सर्वजण शांततेत साजरे करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निर्णयानंतर भारतभक्तीची भावना मांडली आहे. तोच भाव भारतात तयार झालेला आहे. सबका साथ, सबका विकास व सबका विश्वास या तत्वानुसार भारत घडविण्यासाठी सर्वजण या निर्णयाचा एकजुटीने स्वीकार करतील, असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post