आणखी एक 'आघाडी' महाविकास आघाडीत; संख्याबळ १६९वर


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या महाविकास आघाडीत आणखी एक आघाडी सामील झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं संख्याबळ १६९ वर पोहोचलं आहे. 
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी याची माहिती दिली आहे. "बहुजन विकास आघाडीचे नेते आ. हितेंद्र ठाकूर, आ. क्षीतिज ठाकूर आणि आ. राजेश पाटील यांनी आज माझी भेट घेतली व महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. बहुजन विकास आघाडीने दिलेल्या समर्थनाबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत," अशी माहिती चव्हाण यांनी ट्विटरवरून दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post