शिवसेना आमदाराला भाजपाकडून ५० कोटींची ऑफर : विजय वडेट्टीवार


एएमसी मिरर : वेब न्यूज
शिवसेना आमदाराला भाजपाने ५० कोटीची ऑफर दिल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. फक्त शिवसेनेच्याच नाही तर काँग्रेस पक्षाच्या आमदारालाही ऑफर देण्यात आली, असा आरोपही त्यांनी केला आहे.
एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी संवाद साधत असताना विजय वडेट्टीवार यांनी शिवसेना आमदाराला ५० कोटींची ऑफर भाजपाने दिली असं वक्तव्य केलं आहे. आमचे आमदार फुटणार नाहीत याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. निवडणुकीच्यापूर्वी भाजपाने फोडाफोडी केली मात्र जनतेने हे सहन केले नाही. भाजपा जनतेशी बेईमानी करते आहे. भाजपाला महाराष्ट्र माफ करणार नाही. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात आली, तर ते पाप भाजपाचं असेल यात काहीही शंका नाही, त्यांनी म्हटले आहे. भाजपाने एकदा समोर येऊन सांगावं की, आम्ही सत्ता स्थापन करु शकत नाही. दुसऱ्यांना संधी द्या. स्वतः सरकार स्थापन करायचं नाही आणि दुसऱ्याला संधी द्यायची नाही. भाजपाकडून राष्ट्रपती राजवट आणण्याचा डाव सुरु आहे, असाही आरोप वडेट्टीवार यांनी केला.

Post a Comment

Previous Post Next Post