सत्तास्थापनेसाठी झालेल्या विलंबासंदर्भात राज्यपालांशी चर्चा : पाटील


एएमसी मिरर : वेब न्यूज
महाराष्ट्राच्या जनतेने जनादेश महायुतीलाच दिला आहे. लवकरात लवकर महायुतीचं सरकार स्थापन व्हावं अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे. मात्र सरकार स्थापनेला उशीर लागतो आहे. त्याच संदर्भात आम्ही राज्यपालांशी चर्चा केली. आता पुढचं पुढे ठरवू, असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.
राज्यपालांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांना त्यांनी राजभवनाबाहेर माहिती दिली. त्यावेळी ते बोलत होते. गिरीश महाजन, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवारआदी यावेळी उपस्थित होते.
विधानसभा निवडणूक निकाल लागून १३ दिवस उलटून गेले आहेत. तरीही सत्ता स्थापनेचा पेच सुटलेला नाही. भाजपाला १०५ जागा मिळाल्या आहेत तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या आहेत. सत्तेत अर्धा वाटा आणि अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद या दोन मागण्यांमुळे शिवसेना आणि भाजपात चर्चा थांबली आहे. आता ही कोंडी कशी फुटणार आणि सरकार कधी स्थापन होणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post