अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाचं काही ठरलं नव्हतं : नितीन गडकरी


एएमसी मिरर : वेब न्यूज
सत्तास्थापनेचा तिढा अधिकच वाढला आहे. शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मुंबईत येऊन राजकीय परिस्थितीची माहिती घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन होईल, असा विश्वास व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच नेतृत्वात राज्यात सरकार बनेल. अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाचं वाटपाचं काहीही ठरलं नव्हतं. आवश्यकता भासल्यास आपण मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post