शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नाही : चंद्रकांत पाटील


एएमसी मिरर : वेब न्यूज
देवेंद्र फडणवीस यांच्या मागे संपूर्ण भाजप खंबीरपणे उभी असून, त्यांच्याच नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार स्थापन होणार आहे, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेनेकडून अद्यापपर्यंत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. त्यांच्या प्रस्तावासाठी भाजपाची दार खुली आहेत, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
सत्ता स्थापनेचा तिढा सोडवण्यासाठी भाजपाची महत्त्वाची बैठक आज पार पडली. या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.'जर तर'च्या चर्चांना पूर्णविराम देताना संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी असून त्यांना एकमताने  विधीमंडळाच्या नेतेपदी निवडल्याचे व त्यांच्याच नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाटील म्हणाले की, आम्ही लवकरात लवकर सरकार स्थापन करणार आहे. देवेंद्र फडणवीसांचं सरकार राज्यात स्थापन येणार असून, शिवसेनेकडून अद्याप कोणताही प्रस्ताव आलेला नाही. शिवसेनेच्या प्रस्तावासाठी भाजपाचे दरवाजे खुले आहेत. त्यांनी प्रस्ताव पाठवला तर भाजपा विचार करेल.

Post a Comment

Previous Post Next Post