राज्यात भाजपाचंच सरकार, फडणवीस यांचा शब्द : चंद्रकांत पाटील


एएमसी मिरर : वेब न्यूज
राज्यात भाजपाचंच सरकार येणार, असा देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. भाजपाच्या पराभूत उमेदवारांची आज मुंबईत झाली या बैठकीनंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाचंच सरकार येईल असा विश्वास व्यक्त केला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातला सत्तापेच अद्याप सुटलेला नाही. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी हातमिळवणी करुन सत्ता स्थापनेच्या तयारीत आहे. अशात शुक्रवारीही चंद्रकांत पाटील यांनी असंच वक्तव्यकेलं होतं. आता आजही त्यांनी हेच वक्तव्य केलं आहे.
राज्यात भाजपाचे सरकार येणार असा नारा कालही देण्यात आला होता. त्यावर शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातूनही टीका करण्यात आली आहे. या सगळ्याला काही तास उलटत नाहीत तोच भाजपाने पु्न्हा एकदा सत्ता भाजपाचीच येईल असा दावा केला आहे. आमच्याकडे १०५+१४ अशा ११९ आमदारांचं संख्याबळ आहे. आम्हाला घेतल्याशिवाय कुणीही सत्ता स्थापन करुच शकत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. आम्ही विधानसभेला १६४ जागा लढवल्या. त्यातल्या १०५ जागा जिंकल्या. ५९ ठिकाणी भाजपाचे उमेदवार पराभूत झाले. मात्र त्यातल्या ५५ ठिकाणी आम्ही क्रमांक दोनवर होतो. त्यामुळे पराभूत झालेल्या उमेदवारांचं मनोधैर्य खचलेलं नाही असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post