BREAKING NEWS : सरकार स्थापण्यासाठी असमर्थ; भाजप विरोधी बाकांवर बसणार


एएमसी मिरर : वेब न्यूज 
सत्ता स्थापनेसंदर्भात भाजपाच्या कोअर कमिटी बैठक झाल्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या कोअर कमिटीच्या नेत्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन आम्ही सरकार स्थापन करू शकत नाही, असे स्पष्ट केले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, निवडणुकीत महायुतीला जनतेने जनादेश दिला होता. त्यामुळे राज्यपालांनी भाजपला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले होते. मात्र, शिवसेना सत्ता स्थापनेसाठी बरोबर येऊ इच्छित नाही. त्यामुळे सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ असल्याचे राज्यपालांची भेट घेऊन सांगितले आहे. जनादेशाचा अनादर करून शिवसेनेला कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सरकार स्थापन करायचे असेल, तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. एकत्र काम करण्यासाठी जनादेश दिला होता, असेही पाटील यांनी म्हटले आहे. दरम्यान, भाजप आता विरोधी बाकांवर बसणार हे आता स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post