शिवसेनेकडून मुंबई महापौरपदासाठी किशोरी पेडणेकर


एएमसी मिरर : वेब न्यूज
मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून किशोरी पेडणेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं असून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. तर उपमहापौरपदासाठी सुहास वाडकर यांच्या नाव घोषित करण्यात आलं आहे. मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी ही घोषणा केली. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार किशोरी पेडणेकर आणि सुहास वाडकर यांच्या नावाची घोषणा करत आहोत,” अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.
मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ९४ संख्याबळ आहे. यामध्ये शिवसेनेतील इच्छुकांची यादी खूप मोठी होती. विधानसभा निवडणुकीत वरळीत प्रचाराची मेहनत घेणाऱ्या किशोरी पेडणेकर, आशिष चेंबूरकर, समाधान सरवणकर या नगरसेवकांची वर्णी लागणार की अमेय घोले यांच्यासारखे आदित्य ठाकरे यांच्या जवळच्यांना संधी मिळणार की मिलिंद वैद्य, मंगेश सातमकर, शुभदा गुढेकर अशा अनुभवी नगरसेवकांना संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

एकूण संख्याबळ – २२७
जात पडताळणीमुळे पाच सदस्य प्रलंबित
एकूण महिला नगरसेवक – १३२
एकूण पुरुष नगरसेवक – ९५
शिवसेनेचे संख्याबळ एकूण – ९४ (३ अपक्ष)

Post a Comment

Previous Post Next Post