बीएसएनएलच्या २२ हजार कर्मचाऱ्यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज


एएमसी मिरर : वेब न्यूज
आर्थिक अडचणीत असलेल्या ‘भारत संचार निगम लिमिटेड’ने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणारी स्वेच्छानिवृत्ती योजना जाहीर केली होती. बीएसएनएलचे ७० ते ८० हजार कर्मचारी योजनेत पात्र ठरण्याची शक्यता असून, त्यातून कंपनीला वर्षांला ७,००० कोटी रुपयांच्या वेतन खर्चात बचत शक्य होणार आहे. केवळ दोन दिवसांच्या कालावधीतच बीएसएनएलच्या २२ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केले असल्याचे वृत्त आहे.
सध्या बीएसएनएलमध्ये १ लाख ५० हजार कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी १ लाख कर्मचारी व्हीआरएसच्या कक्षेत येतात. ३ डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांना अर्ज करता येणार आहे. जवळपास ७७ हजार कर्मचारी या योजनेचा लाभ घेतील, अशी अपेक्षा आहे. अर्ज करणाऱ्यांपैकी १३ हजार कर्मचारी ‘जी’ श्रेणीतील आहेत. या योजनेमुळे कंपनीच्या ७ हजार कोटी रूपयांची बचत होईल, असा अंदाज आहे.

Post a Comment

Previous Post Next Post