एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी
राष्ट्रपती राजवट मागे घेत देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ
दिली. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली.
राज्यपालांच्या या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि
काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
राज्यपालांचा निर्णय रद्द
करून २४ तासात बहुमत सिद्ध घेण्याचे आदेश देण्यात यावे, अशी विनंती करणारी
याचिका महाविकास आघाडीतील पक्षांनी केली आहे. या याचिकेवर आज (२४
नोव्हेंबर) सकाळी ११:३० वाजता न्यायमूर्ती एन.व्ही. रामन्ना, न्यायमूर्ती
अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठासमोर
सुनावणी होणार आहे.
Post a Comment